Ad will apear here
Next
सरदार पटेल
‘सरदार’, ‘लोह पुरुष’ या विशेषणांची वैशिष्ट्ये वल्लभभाई पटेल यांच्यात लहानपणापासूनच होती. यांच्यातील नेतृत्वाची चुणूक शालेय जीवनात दिसली होती. गुजरातमधील खेडा जिल्ह्यात राहणारे वल्लभभाई शाळेत असताना स्वभावाने खट्याळ व वृतीने बंडखोर होते. अन्यायाविरुध्द ते आवाज उठवत. इंग्रजी शिक्षण घेऊन ते वकिलीकडे वळले. निष्णात वकील म्हणून प्रसिद्धीला आल्यानंतर कालांतराने ते राजकारणाकडे वळाले.

गांधीजींनी १९१६ मध्ये चंपारणचा सत्याग्रह सुरू केला होता. शेतकरी- कामकरी यांचे दु:ख जाणून घेण्याची गांधीजींची वृत्ती अन् अन्यायाच्या नि:शस्त्र प्रतिकारासाठी सत्याग्रहाचे उचललेले पाऊल वल्लभभाई भावले व ते गांधीजींच्या निकट आले. बारडोलीचा सत्याग्रह तर त्यांच्याच नेतृत्वाखाली यशस्वी झाला. तेव्हापासून वल्लभभाई ‘सरदार’ झाले, अशी माहिती ‘सरदार पटेल’ या जीवनकथेतून कृ. भा. परांजपे यांनी दिली आहे.

भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात व नंतर स्वतंत्र भारताची घडी नीट बसावी यासाठी वल्लभभाईंनी अथक प्रयत्न केले. संस्थाने विलीनीकरणात तर त्यांची भूमिका मोलाचीच होती. या सर्व इतिहासाची उजळण या पुस्तकातून होते.

पुस्तक : सरदार पटेल
लेखक : कृ. भा. परांजपे
प्रकाशक : ॠचा प्रकाशन
पाने : ३०४
किंमत : ३८० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZTCBW
Similar Posts
सरदार वल्लभभाई पटेल – भारताचा पोलादी पुरुष देशाचे पहिले उपपंतप्रधान आणि भारताचे पोलादी पुरुष अशी ओळख असलेले राजकीय नेते सरदार वल्लभभाई पटेल यांची ३१ ऑक्टोबर ही जयंती. त्या निमित्ताने, त्यांच्याबद्दलच्या दोन पुस्तकांचा हा अल्प परिचय...
शतश्लोकी आदिशंकराचार्य यांना अवतार पुरुष मानले जाते. अद्वैताचा सिद्धांत त्यांनी मांडला. आठव्या वर्षी चारही वेदांचे ग्रहण त्यांनी केले होते. सोळाव्या वर्षी अलौकिक भाष्यरचना केली. ३२ वर्षांच्या काळात त्यांनी अफाट ग्रंथरचना केली. भाष्यशास्त्र, स्तोत्रग्रंथ, तंत्रग्रंथ व प्रकरण ग्रंथ अशा चतुर्विध स्वरूपात ग्रंथभांडाराचे वर्गीकरण करण्यात आले आहे
श्री गुरुलीलामृत श्री अक्कलकोट महाराज यांची महती व माहिती सर्वदूर पोचलेली आहे. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांची कायम रीघ असते. भक्तांच्या पाठीशी कायम उभे असलेल्या स्वामी सामर्थ्यांच्या लीला कै. गोपाळराव विद्वांस यांनी ‘श्री गुरुलीलामृत (कथासारासह)’ या एकवीस अध्यायी पोठीतून कथन केल्या आहेत.
श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत श्रीपाद श्रीवल्लभ हे भगवान दत्तात्रेयांचे प्रथम अवतार मानले जातात. त्यांचा जन्म सन १३२०मध्ये आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पिठापूर क्षेत्री झाला, अशी माहिती देऊन सुभाष रामचंद्र (बाळ) आळवे उर्फ विठ्ठलदास बाळ यांनी ‘श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत’मधून श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्र सारांश रूपाने कथन केले आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language