Ad will apear here
Next
आज जागतिक हस्ताक्षर दिन! सुंदर हस्ताक्षरातल्या अर्थपूर्ण कविता... ‘असंच होतं ना तुलाही!’
डिजिटल युगात हातानं लिहिण्याचं प्रमाण कमी होत चाललं आहे ही वस्तुस्थिती; पण हातानं लिहिण्यातला आणि सुंदर, वळणदार अक्षरांत लिहिलेलं वाचण्यातला आनंद डिजिटल अक्षरांना येत नाही, हेही तितकंच खरं. म्हणूनच दर वर्षी २३ जानेवारीला जागतिक हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून ‘असंच होतं ना तुलाही’ या हस्तलिखित कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन आज (२३ जानेवारी २०२०) पुण्यात होत आहे.

संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांनी आपल्या अर्थपूर्ण रचना स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरात लिहून या कवितासंग्रहातून सादर केल्या आहेत. बुकगंगा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती अवघ्या महिन्याभरात संपली, यावरून तो कवितासंग्रह रसिकांना किती आवडला, याची प्रचिती येते. ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही हा कवितासंग्रह उपलब्ध आहे. त्यातील काही कविता येथे प्रसिद्ध करत आहोत. 

२३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पुण्यातील नव्या पेठेतील पत्रकार भवनात होणाऱ्या प्रकाशन सोहळ्याला अभिनेत्री मुक्ता बर्वेही उपस्थित राहणार आहे. तसेच, त्या वेळी हा कवितासंग्रह सवलतीत उपलब्ध होणार आहे. 










(‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा. त्याचे ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)











 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZMCCI
Similar Posts
Valentine's Day : ‘ही’ हस्ताक्षरातील प्रेमकविता नक्की वाचा! आज व्हॅलेंटाइन्स डे... मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही’ या कवितासंग्रहातील ही प्रेमकविता नक्की वाचा...
असंच होतं ना तुलाही - मिलिंद जोशी (अभिवाचन व्हिडिओ) संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह डिसेंबर २०१९मध्ये मुंबईत प्रकाशित झाला आणि अवघ्या महिन्यातच त्याची पहिली आवृत्ती संपली. त्यातील कविता तर वाचकांना भावणाऱ्या आहेतच; पण कवितासंग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशींच्याच सुंदर हस्ताक्षरात या कविता लिहिलेल्या आहेत
हवा असा थाटमाट असे गूज लिहायाला... चार जानेवारी हा कवयित्री इंदिरा संत यांचा जन्मदिन. प्रसिद्ध कवयित्री, कर्तृत्ववान स्त्री, गृहिणी, आदी भूमिकांतील इंदिरा संत यांचे साधे आणि सखोल व्यक्तिमत्त्व त्यांच्या धाकट्या सूनबाई वीणा संत यांनी ‘आक्का, मी आणि... ’ या पुस्तकामधून उलगडून दाखविले आहे. सासूबाई म्हणून, आजी म्हणून, घरातली मोठी व्यक्ती
अस्तित्वाच्या पाऊलखुणा : आरती देवगांवकर - कवितांचे अभिवाचन (व्हिडिओ) आरती देवगांवकर यांचा ‘अस्तित्वाच्या पाऊलखुणा’ या कवितासंग्रहातील कविता मुख्यत्वेकरून काही चिंतनपर अनुभव, स्त्रीविषयक संवेदन आणि कविताविषयक धारणा या तीन आशयसूत्रांभोवती गुंफलेल्या आहेत. या कवितासंग्रहातील काही कवितांचे अभिवाचन करत आहेत स्वतः आरती देवगांवकर आणि त्यांचे पुत्र अमर देवगांवकर..

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language