Ad will apear here
Next
छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य


छत्रपती संभाजी महाराज शूरवीर तर होतेच; पण संस्कृतभाषानिपुणही होते. आज (११ मार्च) त्यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने, ‘छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य’ या ग्रंथाचा अल्प परिचय येथे देत आहोत...
.........
शिवाजी महाराज व महाराणी सईबाईसाहेब यांचे पुत्र संभाजी महाराज हे प्रजाहितदक्ष, प्रजेविषयी कनवाळू आणि भारतीय राजनीतीचे सर्वंकष उद्गाते होते. तसेच ते संस्कृत भाषानिपुणही होते. त्यांनी ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाची निर्मिती केलेली आहे. बहुगुणसंपन्न संभाजी महाराजांनी लिहिलेले संस्कृत साहित्य व त्याचे मराठी भाषांतर ‘छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य’ या ग्रंथातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचे संपादन प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम यांनी केले आहे. समकालीन आणि उत्तरकालीन संस्कृत साहित्यातील संभाजी महाराजांचे वर्णन यात वाचायला मिळते. जी वर्णने समकालीन कवींनी, पंडितांनी संस्कृतमध्ये केली आहेत, तसेच जी आता भारतातील विविध भांडारात उपलब्ध आहेत, त्यांचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न यात केला आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांच्या जन्माबद्दलच्या नोंदी, संभाजी महाराजांची दानपत्रे, संभाजी महाराजांनी राजे रामसिंहास लिहिलेले पत्र, संभाजी राजेंचे जातकर्म, संभाजी महाराज विरचित दैवतस्तुती व भोसले वंशज माहात्म्य आदी अनेक गोष्टींचा ऐतिहासिक संदर्भासहित आणि मराठी व इंग्रजी भाषांतरासहित या पुस्तकात समावेश आहे. 

पुस्तक : छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य
संपादक : प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम
प्रकाशक : मराठीदेशा फाउंडेशन, कोल्हापूर
पृष्ठे : २२८
मूल्य : ३५० रुपये

(‘छत्रपती संभाजी महाराज संस्कृत साहित्य’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.) 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZOOCK
 He had a very hectic , short life . Yet he msnaged not only to read ,
but to write a book in a difficult language like Sanskrit !
 He lived for only 32/- years , 9/- of them strggling against Aurangazeb .
He was on the move all the time . He had to be . How could he have
spared the leisure not only to learn but to write in Sanskrit ?
 Are copies of the book available in the library of Anandashram In
Pune ? In the library of the Deccan College , Pune ?
Similar Posts
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,
लॉकडाउनमध्ये मोडी लिपी शिका ऑनलाइन.. तेही मोफत..! करोना विषाणूमुळे ओढवलेल्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकांच्या हातात भरपूर वेळ निर्माण झाला. प्रत्येकाने आपापल्या परीने त्या वेळाचा सदुपयोग करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. काही जण वेगवेगळे ऑनलाइन कोर्सही करत आहेत. अशाच पद्धतीने घरबसल्या मोडी लिपी शिकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे
मिशिगन विद्यापीठातील डॉ. स्टुअर्ट गॉर्डन शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात रिसर्च प्रोफेसर म्हणून रुजू कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये नव्याने सुरू झालेल्या रिसर्च प्रोफेसर योजनेअंतर्गत अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील प्राध्यापक स्टुअर्ट गॉर्डन यांची नियुक्ती करण्यात आली. नुकतेच ते रुजू झाले असून, मे २०२०पर्यंत ते कार्यरत राहतील.
सांगली, कोल्हापूरच्या पुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नियोजन कराड : ‘सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात आलेल्या पुरामुळे प्रचंड हानी झाली. त्यासाठी राज्य सरकारने आवश्यक निर्णय घेतले आहेतच; पण अधिक पाऊस झाल्यानंतर नद्यांमधून वाहून जाणारे जास्तीचे पाणी दुष्काळी भागात वळवणे आणि पूर आला तरी रस्ते वाहतूक, वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कायम

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language