Ad will apear here
Next
‘रायसोनी’मध्ये ‘हायड्रोजन जनरेटर’वर प्रशिक्षण


पुणे : वाघोली येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात मुंबईतील लायन्स क्लब ऑफ अ‍ॅक्शनच्या सहकार्याने ‘हायड्रोजन जनरेटर’वर एका महिन्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. विविध शाखांतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यामध्ये सहभाग घेतला.

इंधन अभ्यासक सुनील जोगदंड, लायन्स क्लब ऑफ अ‍ॅक्शनचे अध्यक्ष जी. बी. लुथ्रिया आणि जिगर चावडा यांनी प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले. पर्यायी इंधन म्हणून हायड्रोजन वायूला विकसित करण्याचे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले. काही प्रात्यक्षिकेही करून दाखविण्यात आली. हायड्रोजन जनरेटर कीट तयार करून त्याची चाचणीही करण्यात आली.

या शिबिरात ५० विद्यार्थी व काही प्राध्यापक सहभागी झाले होते. सहभागी विद्यार्थी-प्राध्यापकांना प्रमाणपत्र देण्यात आले; तसेच हायड्रोजन वायूवर संशोधन करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन लायन्स क्लबच्या वतीने देण्यात आले.

प्राचार्य डॉ. आर. डी खराडकर, डॉ. वंदना दुरेजा, स्नेहा पोखरकर यांच्यासह इतरांनी पुढाकार घेत या प्रशिक्षण शिबिरचे आयोजन करत त्यासाठी मेहनत घेतली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZQFBS
 India could save millions of dollars by pursuing the research on producing hydrogen gas on demand from H2O. The principle is known to all science students.
Lions Club of ACTION Mumbai developed a gadget that could do what is said above and contacted Raisen Institute in Pune for collaborating to in the project to REDUCE POLLUTION. The gadget was connected to the standby generator available with the institute.
We found drastic change in the exhaust gases of the generator working with the gadget.
Byproduct fuel consumption of the generator went down. It used 2 consume 30 lit. of diesel/ hr. on full load that went to 28 lit./hr for next six hours output being the same throughout the experiment.
The Petrol conservation and Research Association formed by the Government of India, joins the Lions Club and Institute, can save the country millions of dollars and make country's economy free from vagaries of cost of imported fuel. www.artofselfhealing.in
Similar Posts
लोणावळ्यात ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप’ मुंबई : लोणावळा येथे ५० घोड्यांसोबत पठारी खेड्यांत ‘मारवाड़ी हॉर्स एंडुरोन्स चँपियनशिप २०१८’ आयोजित करण्यात आली होती.
रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानाला प्रतिसाद पुणे : ‘न किसी की आँख का नूर हूँ, न किसी के दिल का करार हूँ, जो किसी के काम न आ सके, मै वो एक मुश्ते-गुबार हूँ अशा वैफल्याच्या ओळी लिहिणारे, मोगल साम्राज्याचा शेवटचे बादशहा ठरलेले बहादूरशहा जफर यांचे जीवन म्हणजे मूर्तिमंत शोकांतिका आहे,’ अशी खंत ज्येष्ठ उर्दू पत्रकार शमीम तारिक यांनी व्यक्त केली.
‘सरकारने मूलभूत गरजांवर खर्च करावा’ पुणे : ‘मेट्रो आणि मोनोरेल आदी सुविधा देण्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या सरकारने आरोग्य आणि शिक्षण अशा मूलभूत गरजांवर खर्च करावा,’ अशी अपेक्षा मुंबई येथील केईएम रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केली. मनोविकास प्रकाशन, जन आरोग्य अभियान आणि पुना सिटीझन–डॉक्टर फोरम यांच्यातर्फे आयोजित
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोसाठी शासकीय जमीन देण्यास मंजुरी मुंबई : मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळून शहरातील वाहतूकीची समस्या दूर होणार आहे. यासाठी पुणे शहरातील

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language