गाणे, संगीत हा भारतीय चित्रपटांचा आत्मा आहे. शब्द, सूर, लय, ताल यामुळे गाणे सजते. चित्रपटात कलाकारांच्या माध्यमातून ते रसिकांच्या मनात रुजते. अशा निवडक ५० गाण्यांचे रसग्रहण अजिता साने-सोनाले यांनी ‘पडद्यामागचं गाणं’मधून केले आहे.
या गीतांचा वरवरचा अर्थ रसिकांना कळतो; पण त्या गीतांचा गर्भितार्थ, भावार्थ, गीतांची पार्श्वभूमी, दिग्दर्शक व गीतकार यांना अभिप्रेत असलेला अर्थ जाणून तो लेखिकेने यातून वाचकांपर्यंत पोचविला आहे. यात ४० हिंदी व १० मराठी आशयसंपन्न गाणी असून, त्यांची चाल अप्रतिम आहे.
प्रेम, विरहाच्या छटा, निसर्गसौंदर्य व्यक्त करणाऱ्या या गाण्यांमागील भाव उलगडले आहेत. ‘आँधी’तील ‘तेरे बिना जिंदगी से कोई...’ या गाण्यातील अद्भुत गूढ वातावरण, पती-पत्नीच्या नात्यातील पेच, त्याच्यात दुरावा आला असला, तरी एकमेकांबद्दल वाटणारी जवळीक शब्दबद्ध केली आहे. ‘तुझसे नाराज नही जिंदगी’, ‘तू कहाँ, ये बता...’, ‘सखी रे मेरा मन उलझे’, ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास रहा पडा है...’ अशा अवीट गाण्यांचे वेगळे अर्थ यातून समजतात.
पुस्तक : पडद्यामागचं गाणं
लेखक : अजिता साने-सोनाले
प्रकाशक : माणूस प्रकाशन
पाने : १२०
किंमत : १६० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)