Ad will apear here
Next
पांढऱ्यावरती काळे
लहानपणापासून लेखणीशी जोडलेले सख्य कायम टिकून राहिलेले व त्या लेखणीतून व्यवसायाकडे वळलेले साहित्यिक, प्रकाशक म्हणजे राजेंद्र बनहट्टी. बनहट्टी घराण्यात लेखनाची परंपरा होती. त्यामुळे लहान वयातच कथालेखनाचे बीज राजेंद्र बनहट्टींमध्ये रुजले. पुण्यात वडिलांनी सुरू केलेल्या प्रकाशन संस्थेचा कारभार पाहू लागल्यावर त्यांची साहित्यिक मुशाफिरी जोमाने सुरू झाली. याबद्दलचे अनुभव त्यांनी ‘पांढऱ्यावरती काळे’ यामध्ये कथन केले आहे.

आत्मचरित्रपर लिखाण या पुस्तकातील एक भाग आहे. गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेले विविध विषयांवरील त्यांचे लेख यात संपादित स्वरूपात प्रसिद्ध केले आहे. यात साहित्य आणि साहित्यिक या भागात त्यांनी मराठी कथेच्या जन्मापासून तिचा स्फुट कथा ते नवकथा हा प्रवास, कथाकार आचार्य अत्रे, नवकथाकार पु. भा. भावे, अरविंद गोखले, शंकर पाटील, चरित्रकार न. चिं. केळकर, ऐतिहासिक कादंबरीचे निर्माते ना. सं. इनामदार अशा अनेक साहित्यिकांची चित्रण यात आहेत. या शिवाय, मराठी भाषेची गळचेपी, मराठीवर हिंदीचे आक्रमण, अक्षर वाङ्मय आदी लेखही आहेत.
       
प्रकाशन : सुविचार प्रकाशन मंडळ
पृष्ठे : ३३८
मूल्य : ५०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZMMBU
Similar Posts
महाश्वेतादेवी, राजेंद्र बनहट्टी प्रामुख्याने तळागाळातल्या मजुरांच्या, आदिवासींच्या संघर्षमय जीवनावर लेखन करणाऱ्या आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या बंगाली लेखिका महाश्वेतादेवी आणि एका उच्च मध्यमवर्गीय नव्वदीतल्या म्हाताऱ्याची अफलातून कथा ‘अखेरचे आत्मचरित्र’मधून मांडणारे राजेंद्र बनहट्टी यांचा १४ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा थोडक्यात परिचय
राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी यांच्या गौरवार्थ प्रतिवर्षी दोन व्याख्यानांचे आयोजन केले जाते. या वर्षी या व्याख्यानमालेत लेखिका आणि विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची व्याख्याने होणार आहेत.
कवी, लेखक जगदेव भटू यांना राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर भिवंडी : नवी दिल्लीतील डॉ. विशाखा सोशल वेल्फेअर फाउंडेशन तथा आदीलीला फाउंडेशन यांच्या वतीने कवी, लेखक जगदेव भटू यांना यंदाचा राष्ट्रीय समाजगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ सप्टेंबरला नवी दिल्लीत अखिल भारतीय प्रतिभा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते भटू यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
प्रेरणा आयुष्य सगळेच जण जगत असतात; पण ते रडत-कुढत जगायचे की हसत-खेळत हे प्रत्येकाच्या स्वभावावर व विचारांवर अवलंबून असते. म्हणूनच आनंददायी जीवनासाठी विनोद अ. बांदोडकर यांनी ‘प्रेरणा’ या पुस्तकातून केलेले लेखन मार्गदर्शक ठरते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language