
बहुतेक आजार हे खाण्या-पिण्यातील बदलामुळे होत असल्याने योग्य आहार हे शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असतो; मात्र आजारी पडले, तर काय आहार घ्यावा, असा प्रश्न पडतो. याचे उत्तर डॉ. पां. ह. कुलकर्णी यांच्या ‘खा! प्या! बरे व्हा!’मधून मिळते.
आजारानुसार खाण्यापिण्याची माहिती यात दिली आहे. आजाराचे लक्षण किंवा रोग याचीही अगदी थोडक्यात माहिती आहे. मुख्य भर हा आजारातील आहारावर आहे. अर्धशिशी, निद्रानाश, अपचन, आम्लपित, उचकी, एचआयव्ही आणि एड्स, कुष्ठरोग, कोड, कर्करोग, हृदयविकार, मधुमेह, क्षयरोग, प्रोस्टेट विकार, खोकला, गोवर, चक्कर येणे, दमा, दंतविकार, कानात आवाज येणे, भाजणे, मनाचे विकार, मलावरोध, मूळव्याध, संधिवात अशा सुमारे ८० आजारांमध्ये खाण्यास हितकारक पदार्थ यात सांगितले आहेत. शारीरिक व पोटाच्या विश्रांतीची गरज, पावसाळ्यातील आहार, आनंदी आयुष्यासाठी अन्नाचा प्रभाव, अपचन,कुपोषणाची समस्या व निरोगी राहण्याचे फायदे यावरील लेखही यात आहेत.
पुस्तक : खा! प्या! बरे व्हा!
लेखक : डॉ. पां. ह. कुलकर्णी
प्रकाशक : दीर्घायू इंटरनॅशनल
पाने : १४४
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)