Ad will apear here
Next
कवितांची एक सुंदर संध्याकाळ


उत्तम सादरीकरण करणाऱ्या कवीच्या आवाजात मंचावरून त्याच्या कविता ऐकणं हे नेहमीच आनंददायी वाटतं मला. त्यातून तो कवी गायक असेल आणि त्याच्या जोडीला तितकीच सुंदर कविता वाचणारी आणि गाणारी मंडळी असतील तर मग विचारायलाच नको. अशीच एक सुंदर संध्याकाळ आज (२३ जानेवारी २०२०) अनुभवायला मिळाली मिलिंद जोशींच्या ‘असंच होतं ना तुलाही...’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनसोहळ्यात. मराठी कवितासंग्रहाच्या प्रकाशनासाठी हॉलमध्ये तुडुंब गर्दी व्हावी आणि लोकांना बसायला जागा नसल्यामुळे त्यांनी उभं राहून कार्यक्रम ऐकावा हे मराठी कवितेसाठी अतिशय आश्वासक चित्र आहे.

मंदारचं आणि त्याच्या बुकगंगा टीमचं खूप अभिनंदन.

मराठी भाषेसाठी ही मंडळी वाचक आणि लेखक यांच्यातला सुंदर आणि सुजाण दुवा आहेत.

प्रकाशनानंतर एक अतिशय छान अनौपचारिक मैफल अनुभवायला मिळाली. अस्मिताचं नेटकं सूत्रसंचालन, मुक्ताचं साभिनय कवितावाचन आणि मिलिंद जोशी आणि मनीषा जोशी यांच्या सुरांवर स्वार होऊन हृदयापर्यंत पोहोचलेले शब्द... मजा आ गया!!!

मिलिंद जोशी हे इतकं प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे, की त्यांच्या निखळ हसण्यानं आणि असण्यानंच सभागृहात एक प्रसन्न सकारात्मकता भरून राहिलेली जाणवत होती. फेसबुकवर फॉलो करत असल्यामुळे त्यांच्या कवितासंग्रहाबद्दल उत्सुकता होतीच. तसंच त्यांच्या आवाजात त्यांच्या कविता ऐकण्याचीही उत्सुकता होती.

शांतता एका क्षणी म्हणते...
ऐक ना...

इतकी सुंदर कवितेची व्याख्या करतो हा कवी.

‘न लिहिलेली पत्रं
फाडूनही टाकता येत नाहीत
किंवा
जाळूनही टाकता येत नाहीत’

अशी अव्यक्त भावनांची हतबलता असो किंवा

‘सावल्या म्हणजे उन्हाला पडलेल्या घड्या आणि ऊन म्हणजे सावल्यांची विस्कटलेली घडी’ अशी नितांतसुंदर कल्पना...त्यांची कविता, त्यांचे शब्द एक सुंदर संध्याकाळ विणत गेले.

‘शरीर झाले कापूर कापूर
विरून गेले हवेहवेतून
दोन प्रकाशांच्या भेटीची
एकच उरली फक्त प्रभावळ’

ही तरलता मुक्ताच्या आवाजात ऐकताना ऐकणाराच प्रभावळ होऊन गेला.

कॅलिडोस्कोप, ती, व्हॉट्सअॅप, वेळ, फोनकॉल, ब्लेम, टचस्क्रीन, तो अशा कितीतरी सुरेख कविता आणि गझला यांनी ही शब्दसुरांची मैफल फार सुंदर जमून आली.

अतिशय सुंदर हस्ताक्षरात लिहिलेला हा कवितासंग्रह घेऊन आलेय...

पुढचे काही दिवस आता कविता वाचायची आणि स्वतःला विचारून बघायचं... ‘असंच होतं ना तुलाही...’

- अर्चना नामजोशी




(‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा. त्याचे ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहातील काही कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या कार्यक्रमाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. या कार्यक्रमाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. या कवितासंग्रहाबद्दलचा एक अभिप्राय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)






 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZLOCI
Similar Posts
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना
‘रीडिंग वॉल’वर मोफत आस्वाद घ्या अमूल्य साहित्याचा! पुणे : एका अभूतपूर्व संकटामुळे निर्माण झालेल्या संक्रमणकाळाचा अनुभव सध्या सारे जग घेत आहे. या कठीण काळातून तरण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने धडपड करतो आहे. जगण्याची ही धडपड सुकर करण्याचे, तिला दिशा दाखवण्याचे काम करतात चांगले विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन. पुस्तके हा या दोन्हींचा मुख्य स्रोत आहे
‘असंच होतं ना तुलाही’ म्हणजे ओघवत्या हस्ताक्षरातील मनमोही कविता पुणे : ‘कवी कलाकार असेल तर त्याच्या कवितांमधून त्याची कला झिरपते. ओघवत्या अक्षरांतून अगदी अलगदपणे मनातील तरल भावना कागदावर उतरतात आणि त्या वाचल्यावर आपली वेव्हलेंग्थ जुळून मन ट्यून होते. मिलिंदने केलेल्या कविता फेसबुकवरच न विरता त्यांचं मूर्त स्वरूप पुस्तक रूपात आलं ही गोष्ट महत्त्वाची आहेच; पण त्या
आकाशफुले...! जीए नावाचं गूढ थोडंसं उकलताना...! एखादा दिवस आयुष्याला असा काही धक्का देऊन जातो, की त्याची सुखद जाणीव प्रत्येक पावलासोबत जवळ राहते. तो दिवसही मनात वेगळा कप्पा तयार करून स्वतःहूनच त्यामध्ये जाऊन बसतो. अधूनमधून बाहेर डोकावतो, आणि नव्या दिवसावरही तो जुना, सुखद अनुभव गुलाबपाण्यासारखा शिंपडून जातो... अगदी अलीकडचा तो एक दिवस असाच, मनाच्या कप्प्यात जाऊन बसला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language