जीवनात नेहमीच वेगळे, नवीन टप्पे येत राहतात. नवीन वाटा, दिशा शोधणे हे आवश्यक असतेच, पण त्यासाठी आंतरिक उर्मी हवी. म्हणूनच वेगवेगळ्या टप्प्यांवर करियरचे नियोजन करण्याऐवजी ‘लाइफस्टाइल डिझाइन’ या संकल्पनेचा विचार करण्याची गरज टीमोथी फेरीस यांनी ‘दी फोर अवर वर्क विक’मधून व्यक्त करीत ती प्रत्यक्ष कशी आणता येईल, हे विस्ताराने सांगितले आहे.
या मव्या ‘जीवनशैलीची रचना’बद्दल काही प्रश्न मनात उद्भवू शकतात, त्यांची उत्तरे देत श्रीमंतीची नवी व्याख्या ‘न्यू रिच’ (एनआर) त्यांनी सांगितली आहे. आयुष्यात मोकळा वेळ मिळविणे व उत्पन्नाचे नावे मार्ग शोधण्यासाठी ‘DEAL’ ही संकल्पना येथे विशद केली आहे. जीवन जगण्याची कला साध्य करताना आयुष्यात समतोल कसा राखावा, पैसा कमावण्यासाठी सुरक्षिततेतून बाहेर स्वतःची ऊर्जा आणि वेळ यांचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले आहे. एकूणच स्वप्ने कशी पहावीत आणि आयुष्य कसे जगावे हे फेरीस यांनी या पुस्तकात सांगितले आहे. याचा मराठी अनुवाद डॉ. कमलेश सोमण यांनी केला आहे.
पुस्तक : दी फोर अवर वर्क विक
लेखक : टीमोथी फेरीस
अनुवादक : डॉ. कमलेश सोमण
प्रकाशक : गोयल प्रकाशन
पाने : ४२४
किंमत : ३०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)