
एखाद्या बाईला तिळे झाले, तर ‘कसे सांभाळता हो तुम्ही,’ असा प्रश्न अनेकांच्या तोंडी येतो. याचा सामना करीतच शेफाली वैद्य यांनी अनन्या, अर्जुन आणि आदित्य या त्रिमूर्तींच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. या तिळ्यांच्या जन्मापासूनची जडणघडण त्यांनी ‘घर हिंडते आकाशी’मधून शब्दबद्ध केली आहे.
मुलांमध्ये एखाद्या वस्तूवरून भांडण झाल्यास ते सोडविताना ‘वस्तूपेक्षा माणसं महत्त्वाची असतात,’ असे त्या समजावून सांगतात. अन्य एका प्रसंगात हेच उपदेशामृत चिमुकल्या मुलीकडूनच मिळाल्यानंतर पालकत्वाचा मोठा धडा मिळाल्याचे लेखिका सांगते. शनिवारवाड्यात पडलेला कचरा मुलांनी उचलून पेटीत टाकणे, साठविलेल्या पैशातून मामाच्या वाढदिवसाला छानशी भेटवस्तू आणणे, पिगी बँकेत पैसे साठल्यानंतर खेळ घेण्याचे आणण्याचे स्वप्न असते; पण ड्रायव्हर काका संकटात असल्याचे पाहून ते सर्व पैसे त्यांना मदत म्हणून देणारी समंजस अनन्या, मुलांच्या प्रत्येक अगदी अवघड वाटणाऱ्या प्रश्नाला उत्तरे देण्याचा लेखिकेचा प्रयत्न, अशा अनेक प्रसंगातून लेखिकेने मुलांवर केलेले संस्कार, त्यांचे मुलांकडून होणारे पालन व मुलांचे सामाजिक भान यातून दिसून येते.
पुस्तक : घार हिंडते आकाशी
लेखक : शेफाली वैद्य
प्रकाशक : इंद्रायणी साहित्य प्रकाशन
पाने : १४८
किंमत : १७० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)