Ad will apear here
Next
हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे
चांगल्या व उत्तम स्वास्थ्याची गरज सर्वांनाच असते; मात्र जोपर्यंत आजारी पडत नाही, तोपर्यंत आपल्या शरीराची व अवयवांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष केले जाते. शरीराकडे लक्ष देणे म्हणजे काय, त्यातून होणारे फायदे, आजारांना प्रतिबंध करणे यांवर संशोधन करून डॉ. रवींद्र कारभारी आहेर यांनी ‘हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे’मधून निरोगी आरोग्यासाठी कानमंत्र दिला आहे. आरोग्याचे उगमस्थान व आजारांना निमंत्रण कसे मिळते, हे त्यात समजावून सांगितले आहे. मानदुखी, पाठ व कंबरदुखी, ऑफिसच्या कामांमुळे होणारे त्रास, मूळव्याध, अॅसिडिटी अशा ४४ आजारांना प्रतिबंध कसा करायचा, हे या पुस्तकात सांगण्यात आले आहे. आहाराचा आरोग्यमंत्र देताना योग्य, समतोल व चुकीचा आहार कोणता आणि कसा याचीही माहिती यात दिली आहे. गर्भधारणा झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, रोजचा दिनक्रम, व्यायामाचे महत्त्व, अवयवांनुसार व्यायामही यात सांगितले आहेत. या सर्वांना चित्रांची जोड असल्याने विषय समजण्यास सोपे जाते.

पुस्तक : हेल्थ सिक्रेट्स - रहस्य आरोग्याचे
लेखक : डॉ. रवींद्र आहेर
प्रकाशन : हिराई पब्लिकेशन
पृष्ठे : २०६
मूल्य : ३०० रुपये

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZVYBV
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
|| साधनामस्त || नर्मदा परिक्रमेचं हे कथन लेखक जगन्नाथ कुंटे यांनी पहिल्यांदा केलेल्या परीक्रमेचे अनुभव यापूर्वी त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. 'साधनामस्त' मध्ये त्यांच्या चौथ्या परीक्रमेचे अनुभव आले आहेत. पहिल्या परीक्रमेपेक्षा ही वेगळी. त्यात भेटणारी माणसं वेगळी, अनुभव वेगळे. मात्र ही परिक्रमा पहिल्या परीक्रमेप्रमाणेच
रिकामा कॅनव्हास भारतीय स्त्रीची प्रतिमा पूर्वीपासून सहनशील, आज्ञाधारक, कुटुंबवत्सल अशी आहे. या प्रतिमेतील स्त्रीचे दर्शन अमृता प्रीतम यांच्या 'रिकामा कॅनव्हास' या कथासंग्रहातून दिसते. मात्र, या कथा स्त्रीवादी असल्या तरी यातील स्त्री कुमकुवत नाही, परीस्थितीचे रडगाणे न गाता त्यावर मत करून धैर्यशीलतेचे दर्शन घडविणारी आहे
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language