Ad will apear here
Next
उद्योगपती, करोडपती व्हावं कसं?
उद्योगपती व्हायचे, हे स्वप्न महत्त्वाकांक्षी असून, त्याची पायवाटही खडतर असते; मात्र ध्येय, जिद्द, परिश्रम, सचोटी, प्रामाणिकपणा, व्यवहार्यता, मानवता या गुणांशी जुळवून घेतले, की यशस्वी उद्योजकाची ‘मंजिल’ सहज साध्य होऊ शकते, अशी शिकवण संभाजीराजे प. घोरपडे यांनी ‘उद्योगपती, करोडपती व्हावं कसं?’ या पुस्तकामधून दिली आहे. धंदा कसा करावा, त्यासाठी आवश्यक गुणवैशिष्ट्ये, मानवी स्नेहसंबंध, महाराष्ट्रीय माणसे उद्योगात मागे का?, व्यवसाय व नोकरीचे समालोचन, श्रीमंतीचा मूलमंत्र, गुंतवणूक व्यवस्थापन, पॉझिटिव्ह थिकिंग अशा प्रकरणांमधून १७५ मुद्द्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले आहे. पुढे टाटा, बिर्ला उद्योगसमूह, अंबानी, भंवरलाल जैन, अमूल उद्योग यांची यशोगाथा, तसेच ‘केएफसी’चे कर्नल हार्लंड सँडर्स, अॅरिस्टॉटल ओनॅसिस, बार्बी थॉमस, डोनाल्ड ट्रम्प, जिलेट किंग कँप, सॅम वॉल्टन, स्टीव्ह जॉब्ज अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजकांची माहिती दिली आहे. मुंबईचे डबेवाले, लिज्जत पापड, एस्सेल ग्रुप, स्वयंसिद्धा, प्रवीण मसाले यांचीही ओळख या पुस्तकात करून देण्यात आली आहे.

पुस्तक : उद्योगपती, करोडपती व्हावं कसं?
लेखक : संभाजीराव घोरपडे
प्रकाशक : अद्वैत प्रकाशन
पृष्ठे : १५१
मूल्य : २०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZRHBZ
Similar Posts
पोटली परदेशात राहणारे भारतीय ही आता नवीन गोष्ट राहिली नसली, तरी अद्याप त्यांच्या विषयीचे कुतूहल कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कायम आहे. कारण त्यांना येणाऱ्या अनुभवांचे वेगळेपण आणि त्यांचे आचार-विचार हे त्या कुतूहलास कारणीभूत ठरतात. दुबई-अबुधाबी आणि
अष्टावक्र-नाथगीता पुस्तक आणि ई-बुकचे प्रकाशन पुणे : सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात अष्टावक्र-नाथगीता या पुस्तकाचे, तसेच ई-बुकचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. वृषाली पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहिले असून, आरंभ प्रकाशनने ते प्रकाशित केले आहे. ‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे
ये हौसला कैसे झुके, ये आरजू कैसे रुके... रत्नागिरी जिल्ह्यातल्या साखरप्यासारख्या लहानशा गावातून एक मुलगा पुण्यात पोहोचला आणि नंतर त्याच्या स्वप्नांनी त्याला थेट अमेरिकेत नेऊन पोहोचवलं. अमेरिकेत जाऊनही त्यानं आपलं मूळ गाव साखरपा आणि पुणे यांच्याशी असलेली नाळ तोडली नाही. या तरुणाचं नाव आहे मंदार मोरेश्वर जोगळेकर! ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदराच्या
मनात रेंगाळणाऱ्या कथा मानवी मनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणाऱ्या चार दीर्घकथा दीप्ती मडी यांनी ‘मंचल’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर आणल्या आहेत. ‘मनातल्या चलबिचलीच्या कथा’ असं या पुस्तकाचं उपशीर्षक असलं, तरीही या कथांमधून त्यातील पात्रांच्या विचारांमध्ये असलेला ठामपणा आपल्याला जाणवतो. या कथासंग्रहाचा हा परिचय...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language