Ad will apear here
Next
कलाशास्त्र विशारद (भाग दोन)- मध्यमा
संगीत विद्यार्थ्याला संगीतशास्त्राबद्दलची महत्त्वाची माहिती शिल्पा बहुलेकर यांच्या ‘कलाशास्त्र विशारद (भाग दोन)- मध्यमा’मधून मिळते. रागांची माहिती, मुक्त आलाप-ताना, तसेच विविध रागांमधील तुलना असे माहितीपूर्ण मुद्दे यात सोप्या भाषेत स्पष्ट केले आहेत. भातखंडे व पलुस्कर लिपीबद्दलची माहितीही आहे. विविध तालांची दुगु-तिगुन, आड-कुआड आदींची गणितासहित लयकारी लिपीबद्ध करून ती भातखंडे-पलुस्कर दोन्ही लिपींत दिली आहे.

रागपरिचय, रागांचे तुलनात्मक अध्ययन, राग ओळखण्यासाठी टीपा, निबंध, वाद्यांची चित्रांसहीत माहिती, पंडित विष्णू नारायण भातखंडे, सम्राट तानसेन, पंडित शिवकुमार शर्मा, मसितखाँ, गुलाम रजीखाँ यांची तसेच गोपाल नायक, आमीर खुसरो, मानसिंह तोमर, जयदेव, त्यागराज, पुरंदरदास आदी संगीतज्ज्ञांची जीवनचरित्रे, विविध लेख हेही मुद्दे यात समाविष्ट आहेत.

संगीताच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील सर्वच मुद्दे या पुस्तकात आहेत; तसेच संगीताबद्दलची माहिती जाणून घेण्यास इच्छुकांना यातून माहिती उपलब्ध होईल. याच्या मराठी व हिंद्री आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत.

पुस्तक : कलाशास्त्र विशारद (भाग दोन)- मध्यमा
लेखक : डॉ. शिल्पा बहुलेकर
प्रकाशक : संस्कार प्रकाशन
पाने : १६०
किंमत : २०० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZQJBX
Similar Posts
संगीत निबंधावली संगीत विषयात रुची असणाऱ्यांना, संगीताच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती किरण फाटक यांच्या या पुस्तकातून मिळते. सूर आणि ताल आणि त्यांची एकत्रित मांडणी म्हणजे संगीत, असे ते सांगतात. शब्द नंतर येतात. संगीत आणि साधनेचा संबंध कसा असतो, याची माहिती दिल्यानंतर संगीत कला आणि शास्त्र यांचा परस्परसंबंध ते लावतात
मला लाट व्हायचंय जलतरणपटू शुभम वनमाळी याच्या रोमांचकारी जलतरण प्रवासाचे चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे. शुभमचे आई-वडील दीपिका आणि धनंजय वनमाळी यांनी हा प्रवास शब्दबद्ध केला आहे. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया, इंग्लिश खाडी, जिव्लाल्टरची सामुद्रधुनी, कॅटलिना खाडी, मॅनहॅटन मॅरेथॉन स्विम यासारख्या जलतरण मोहिमा शुभमने पूर्ण केल्या आहेत
लयमंजिरी नृत्यकला ही ६४ कलांमधील आयुष्य समृद्ध करणारी एक कला आहे. नृत्यालंकार वृषाली शशांक दाबके यांनी कथ्थक नृत्य कलाकारांच्या कलेवर आधारित माहिती देणारे लेखन केले आहे.
कथा एका अभाग्याची आयुष्यात प्रत्येकाची एक लढाईच सुरू असते. बहुतांश वेळा ही लढाई परिस्थितीशी असते. शामसुंदर महादेव नार्वेकर यांच्या या छोटेखानी आत्मचरित्रातील नायकही असाच परिस्थितीशी लढत राहातो. कधी जिंकतो, तर कधी हरतो. नार्वेकर यांचे हे आत्मपर लेखन आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language