Ad will apear here
Next
‘पुणेरी पलटण’ने महिलांना दिले स्वसंरक्षणाचे धडे
पुणे : शक्ती आणि बुद्धी कौशल्याचा कस लागणाऱ्या कबड्डी खेळातील चालींचा  उपयोग महिलांना स्वसंरक्षणासाठीही करता येऊ शकतो, याचे प्रात्यक्षिक ‘पुणेरी पलटण’ने दाखवले. 

कबड्डीमधील चाली  महिलांना स्वसंरक्षणासाठी उपयुक्त ठरतात याचे धडे देणारी कार्यशाळा शनिवारी, २ सप्टेंबर रोजी ‘मल्टीफिट’च्या सेनापती बापट रस्त्यावरील शाखेत घेण्यात आली. 

प्रो- कबड्डी लीगमधील एक प्रमुख संघ ‘पुणेरी पलटण’चे मुख्य मार्गदर्शक आणि कबड्डीपटू अशोक शिंदे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. त्यांनी कबड्डी खेळामधील विविध चालींचा वापर महिला आणि मुली आपत्कालीन परीस्थितीत स्वसंरक्षणासाठी कसा करू शकतात, हे सांगितले. 

चोक डिफेन्स, कीक्स, पंचेस यासह विविध मार्शल आर्ट्सच्या चाली शिकवण्यात आल्या ; तसेच आपत्कालिन परिस्थितीत लवकरात लवकर जवळच्या पोलीस स्टेशनला कसे जायचे, या संबंधीदेखील माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला पुण्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

या वेळी अशोक शिंदे म्हणाले, ‘ कबड्डी हा एक आक्रमक खेळ असून यातील बऱ्याच चाली या मार्शल आर्ट्स सारख्या आहेत. महिलांनी स्वतःच्या बचावासाठी सक्षम असले पाहिजे. आजच्या कार्यशाळेचा महिलांना निश्चितच फायदा होईल, अशी मला खात्री आहे.’ या वेळी पुणेरी पलटणचे सीईओ कैलाश कांडपाल उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZYRBG
Similar Posts
पुणेरी पलटणचे अंध कबड्डी खेळाडूंना मार्गदर्शन पुणे : अंध कबड्डी खेळाडूंचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रो कबड्डी लीग मधील एक प्रमुख संघ पुणेरी पलटणने पुढाकार घेतला आहे. यानिमित्त अखिल भारतीय अंध स्त्री-हित असोसिएशन (एआयएएसएचए) या सामाजिक संस्थेच्या अंध खेळाडूंसाठी नुकतेच फिनिक्स मॉलमध्ये एका कबड्डीच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. १८ खेळाडूंनी हा कबड्डीचा सामना खेळला
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language