Ad will apear here
Next
येत्या चार वर्षात नऊ लाख रोजगार
टीमलीजचा अहवाल
मुंबई :  बँकिंग, वित्त सेवा व विमा आदी क्षेत्रांमध्ये पुढील चार वर्षांमध्ये सुमारे नऊ लाख रोजगार निर्माण केले जातील, असा निष्कर्ष टीमलीज सर्व्हिसेसच्या वार्षिक ‘जॉब्ज व सॅलरीज प्रिमियर रिपोर्ट’ या अहवालात नोंदवण्यात आला आहे. नऊ शहरांमधील १७ क्षेत्रांचे विश्लेषण या अभ्यास अहवालात करण्यात आले आहे. यामध्ये एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या अवधीतील व्यावसायिक घडामोडींचा अभ्यास करण्यात आला असून, निवडक शहरे व उद्योगांमधील कौशल्यांची सांगड वेतनासोबत घालण्यात आली आहे. 

 याबाबत  टीमलीज सर्व्हिसेस लिमिटेडच्या बीएफएसआय व्हर्टिकलचे प्रमुख अमित वडेरा म्हणाले,  ‘विविध क्षेत्रांमधील तांत्रिक प्रगतीचा थेट परिणाम म्हणून ही रोजगार निर्मिती होईल.ऑटोमेशनच्या प्रक्रियेमुळे बँकिंग क्षेत्राच्या कामांमध्ये मोठी क्रांती घडून आली आहे. सरकारी‌ व खासगी घटकांच्या गुंतवणुकीमुळे निर्माण झालेल्या रोजगारांबरोबर या क्षेत्रात नवीन रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. नवीन कौशल्य असलेल्या व्यक्तींची गरज भासेल. रोबोट प्रोग्रामर्स, ब्लॉकचेन आर्किटेक्टस, प्रोसेस मॉडेलर एक्स्पर्टस, डेटा वैज्ञानिक आणि क्लाएंट सहभाग व्यवस्थापक अशा नवीन प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होतील. भारत सरकारच्या बँकांना भांडवल पुरवठा योजनेमुळे देशातील पत वाढ १५ टक्के होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये जीडीपी वाढीचा दर सात टक्के होण्याची‌ अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये बँकिंग, वित्त सेवा व विमा क्षेत्रामध्ये अतिरिक्त नोकऱ्या निर्माण होतील. या उद्योगांमध्ये वेतनात दोन आकडी वाढ झाली असून, सर्वाधिक वाढ बेंगळूरू येथे १२.६३ टक्के, तर दिल्ली येथे १२.२६ टक्के इतकी वाढ झाली आहे. बेंगळूरूमध्ये एंटरप्राईझ आर्किटेक्टला एक लाख २९ हजार रुपये इतके वेतन मिळत होते, तर अहमदाबादमध्ये त्याकरता एक लाख २५ हजार रुपये वेतन मिळत होते.’

‘सरकारी उपक्रमांचाही ह्या क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होईल. सार्वजनिक बँकांना भांडवल पुरवठा करण्याच्या दोन वर्षीय योजनेच्या शुभारंभामुळे या उद्योगाला चालना मिळेल व अधिक रोजगार संधी निर्माण होतील; तसेच, २०१८-१९ च्या  अर्थसंकल्पानुसार, मुद्रा योजनेमध्ये तीन ट्रिलियनची तरतूद  आणि एमएसएमईजसाठी तीन हजार ७९४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने या क्षेत्राचा कायापालट होईल आणि याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल’, असे वडेरा यांनी स्पष्ट केले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZKWBR
Similar Posts
येस बँकेची महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीशी भागीदारी मुंबई : खासगी क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची बँक असलेल्या येस बँकेने स्टार्ट-अप कंपन्यांना आर्थिक पाठबळ देण्याकरीता महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी (एमएसआयएनएस) या संस्थेशी करार केला आहे. एमएसआयएनएस ही संस्था महाराष्ट्र राज्यातर्फे स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी उभारण्यात आली आहे. गेल्या २५
बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यातून १०४ जणांना रोजगार मुंबई : राज्य शासनाचा उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला उदंड प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
‘महिंद्रा इन्शुरन्स’चे यश मुंबई : महिंद्रा इन्शुरन्स ब्रोकर्स लिमिटेडने (एमआयबीएल) सीएमएमआय इन्स्टिट्यूट पीपल कॅपबिलिटी मॅच्युरिटी मॉडेलचा पाचव्या स्तरावरील मॅच्युरिटी गाठली आहे, हा टप्पा गाठणारी ही जागतिक स्तरावरील पहिली इन्शुरन्स ब्रोकिंग कंपनी ठरली आहे.
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language