
गृहिणी व नोकरदार महिलांची रोजच्या स्वयंपाकाची हजेरी चुकत नसते. घरातील लहान मुले, कर्त्या व्यक्ती, ज्येष्ठ अशा सर्वांसाठी आरोग्यपूरक स्वयंपाक तयार करणे आवश्यक ठरते. याचा विचार करत वैद्य सुयोग दांडेकर यांनी ‘गृहवैद्य’मधून आयुर्वेदांतर्गत आहार, आहारशास्त्र शिकविले आहे. छोट्या-मोठ्या आजारांसाठी स्वयंपाकघरातील दवाखान्याचा कसा उपयोग होऊ शकतो, हेही त्यांनी सांगितले आहे.
आयुर्वेदाच्या इतिहासात आयुर्वेदाची आठ अंग, मूलतत्त्वे, गुण वैशिष्ट्ये कथन करीत जन्ममहिन्यावरून प्रकृती कशी ओळखावी, आहाराचे पचन, सर्वसाधारण आहारयोजना, मासिक पाळीत घ्यावयाची काळजी, त्रिदोषाचे प्रकार, स्थान व कार्य, आयुर्वेद हा प्रत्येकाच्या जीवनशैलीचा भाग असून, प्रत्येक अवयवांची काळजी कशी घ्यावी, हे यात दिले आहे.
पुढे आयुर्वेदानुसार प्रकृती ओळखून आहार, मांसाहार, मसाल्याच्या पदार्थांचा गुणधर्म, परसदारी लावता येणारी औषधी वनस्पती यांची माहिती दिली आहे. रुचकर तरीही पथ्यकर असलेल्या पदार्थांची कृतीही यात आहे. पंचकर्म चिकित्सा, घरगुती औषधे, निसर्गोपचार, लहान मुलांचे आजार, संधिवात, आमवात, हृदयरोग, उच्चरक्तदाब, मधुमेह, मुळव्याध आदी अनेक आजारांची लक्षणे, औषधे सांगितली आहेत.
पुस्तक : गृहवैद्य
लेखक : सुयोग दांडेकर
प्रकाशक : सुकृत प्रकाशन
पाने : २००
किंमत : ३५० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)