Ad will apear here
Next
काळा धूप - Canarium strictum (Burseraceae)
1

सदाहरित जंगलांत सर्वाधिक उंच झाडांपैकी एक, साधारण 120 फुटांच्या आसपास. सह्याद्रीतील सध्या अति दुर्मिळ प्रकारात असलेला हा वृक्ष. पिंगुळीला दोन वर्षांपूर्वी लावलेले हे झाड छान 6 फूट उंचीचे झाले. आठवड्यातून दोन वेळा पाणी, मुळाजवळ फूटभर पालापाचोळ्याचा थर आणि थोडी सावली जिथे 2 - 3 तास ऊन येईल अशा ठिकाणी या झाडाची वाढ छान दिसतेय. भरपूर उन्हात हे झाड व्यवस्थित वाढत नसल्याचे मी पाहिले आहे.

झाडांच्या देखील काही ठराविक जागा असाव्यात. विशेषतः असे सदाहरित वृक्ष लावताना झाडांशी संवाद करून, त्याच्या आवडीची जागा समजून घेऊन रोप लावल्यास झाडे झर झर वाढतात. यात अतिरंजकता नाही. हा संवाद म्हणजे केवळ शब्दांचे बोलणे नसून, झाड समजून घेण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत झाडाची मूळ वाढ, त्याच्या गरजा, माती, पाणी, सहवृक्ष, सूक्ष्मजीव व इतर मित्रपरिवार, पालापाचोळा वगैरे अनेक मुद्दे असतात. आपली सोबत आणि काळजी देखील तितकीच महत्वाची.

'मत्स्यरक्ती' रंगसंगतीची पालवी फुटू लागली की या झाडांकडे बघत रहावं. अत्यंत मनोहारी व तितक्याच बहुपयोगी या वृक्षाची फळे हॉर्नबिल पक्षी देखील आवडीने खातातात. या वृक्षात नर मादी झाडेच वेगळी वेगळी असतात. त्यामुळे भविष्यात फळे किंवा बिया हव्या असतील तर एक झाड लावून चालणारे नाही!

- मिलिंद पाटील

2

3

4
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZXYHCO
Similar Posts
'रायवळ' रुजवताना... रायवळ आंब्याच्या बाठा रुजवण्याची एक पद्धत सांगून ठेवतो. पाऊस पडला की पहार घेऊन जिथे झाड लावायचे आहे तिथेच एक ते दीड फूट खोल होल मारायचा. या होलात कुजलेला पालापाचोळा भरायचा. यावर जमिनीबरोबर हा आंब्याचा बाठा आडवा ठेवायचा आणि वर एक इंचभर माती ओढायची. झालं काम!
नागचाफा (Mesua ferrea) शुभ्र सुवासिक फुले पाहून अनेकांना हा महाकाय वृक्ष असतो याचे आश्चर्य वाटते. सदाहरित जंगलांतील उंच वाढणाऱ्या वृक्षांच्या यादीत द्वितीय श्रेणी पटकावणारा, अत्यंत सावकाश वाढणारा, गर्द सदाहरित वृक्ष, नागचाफा...
‘भिकेडोंगरी’चो भेळो डोंगर चढायला सुरुवात झाली, गर्द झाडीतून, बांबूच्या बनातून वाट काढत आम्ही चालू लागलो. उत्सुकता शिगेला पोहोचली होती. खरंच, केवढा असेल न हा वृक्ष. भेळो, अर्थात बेहडा Terminalia bellirica (Gaertn.) Roxb. Family: Combretaceae संस्कृत मध्ये याला ‘बिभीतक’ किंवा ‘अक्ष’ असेही नाव आहे.
सातवीण - Alstonia scholaris (L.) R. Br. कोकणात दिवाळीत ‘चावदिसाक’ सकाळी तुळशी वृंदावनासमोर ‘गोविंदा ss, गोविंदा sss, गोssविंदा..’ म्हणंत हिरव्या गार बुळबुळीत कारीट्याचा वध करून गोड-धोड खाण्याची इच्छा घेऊन घरात जाल तर आज्जी पेल्यात एक अत्यंत कडू करड्या रंगाचा विचित्र रस घेऊन वाटेत उभी असायची. मग या पेल्यातील एक तरी घोट घेतल्याशिवाय गत्यंतर नसायचं

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language