Ad will apear here
Next
फ्रेडरिक ब्राउन, प्रभाकर तामणे
आपल्या कथांचा अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक शेवट करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या फ्रेडरिक ब्राउनचा आणि आपल्या मजेशीर विनोदी कथांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रभकर तामणे यांचा २९ ऑक्टोबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... 
..............

फ्रेडरिक ब्राउन 

२९ ऑक्टोबर १९०६ रोजी सिन्सनॅटीमध्ये जन्मलेला फ्रेडरिक ब्राउन हा त्याच्या गुप्तहेर कथांसाठी आणि विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या कथांमधून विनोदाची पखरण असायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कथांचा होणारा अनपेक्षित आणि धक्कादायक शेवट!  

त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे ‘त्याचा जन्मच मुळी लेखनासाठी झाला होता. मनासारखं कथानक सुचेपर्यंत तो अस्वस्थ असायचा. मग एकटाच बस पकडून दूर कुठेतरी निघून जायचा आणि एकांतात बसून विचार करायचा. एकदा का प्लॉट सुचला, की मग तो घरी येऊन त्याचा टाइपरायटर सरसावून कोपऱ्यात बसे आणि बस्स.. धाडधाड टायपिंग सुरू... मग एखादी जबरदस्त रहस्यकथा, एखादी अद्भुत कथा, विज्ञानकथा किंवा ब्लॅक कॉमेडी.... किंवा मग या सर्वांचच धमाल मिश्रण!’  

त्याच्या अंतरिक्ष प्रवासाविषयीच्या विज्ञानकथा गाजल्या होत्या. मंगळावरून पृथ्वीवर आलेल्या हिरव्या रंगाच्या खुज्या ‘मंगळ्यां’वर त्याने लिहिलेली ‘मार्शन्स, गो होम’ ही कथा लोकप्रिय झाली होती.

फॅब्युलस क्लिपजॉइंट, दी माइंड थिंग, नाइट ऑफ दी जॅबरवॉक, हनिमून इन हेल. व्हॉट मॅड युनिव्हर्स, स्पेस ऑन माय हॅन्स्इ, दी वेंच इज डेड कार्निव्हल ऑफ क्राइम, दी स्क्रीमिंग मिमी, पॅरॅडॉक्स लॉस्ट अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

११ मार्च १९७२ रोजी अॅरिझोनामध्ये त्याचा मृत्यू झाला. 
...................

प्रभाकर तामणे 

२९ ऑक्टोबर १९३१ रोजी जन्मलेले प्रभाकर तामणे लोकप्रिय झाले ते त्यांच्या विनोदी शैलीतल्या कथांमुळे. गरवारे कॉलेजमधली मराठीची प्राध्यापकी सांभाळून त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या.
 
‘अशीच एक रात्र येते’ हे त्यांचं फ्लॅशबॅक तंत्रातलं नाटक चांगलंच गाजलं होतं आणि त्याचे हिंदी, गुजराती, पंजाबी आणि कोकणी भाषांमध्ये अनुवादही झाले होते. त्यांनी चित्रपटांसाठी कथा-पटकथाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेले एक धागा सुखाचा, मधुचंद्र, रात्र वादळी काळोखाची यांसारखे मराठी चित्रपट गाजले. तसंच त्यांच्या कथेवर राज कपूरने काढलेला ‘बीवी ओ बीवी' हा विनोदी सिनेमाही गाजला होता. 

अनामिक नाते, छक्केपंजे, एक कळी उमलताना, घडीभरची वस्ती, हुंडा पाहिजे, जीवनचक्र, लाइफमेंबर, पुनर्मीलन, सांगू नको साजणी, मध्यरात्री चांदण्यात, तो स्पर्श... तो सुगंध, दिनू, हिमफुलांच्या देशात, हा स्वर्ग सात पावलांचा, माझ्या बायकोचा नवरा, मध्यरात्री चांदण्यात, रात्र कधी संपूच नये, संगीत प्रेमबंधन असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

(तामणे यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZQXBH
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language