२४ ते २६ जानेवारी २०२० या कालावधीत रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या प्रांगणात तेरावा आर्ट सर्कल संगीत महोत्सव पार पडला. त्यात विविध नामवंत कलाकारांनी आपली कला सादर केली. रत्नागिरीतील लेन्सआर्ट या फोटोग्राफर्सच्या ग्रुपमधील सदस्यांनी या कलाकारांच्या टिपलेल्या भावमुद्रा येथे प्रसिद्ध करत आहोत.
उपेंद्र बापट, विवेक सोहनी, वल्लभ नाटेकर आणि सिद्धेश वैद्य या फोटोग्राफर्सनी या भावमुद्रा टिपल्या आहेत.
(या महोत्सवाचे सविस्तर वार्तांकन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
नृत्यकीर्तनानंतर विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांची मैफल झाली. अजय जोगळेकर यांनी त्यांना संवादिनीची, तर मंगेश मुळ्ये यांनी तबल्याची साथ केली.
त्यानंतर संतूरवादक संदीप चॅटर्जी आणि बासरीवादक संतोष संत यांची जुगलबंदी रंगली. तिला तबलावादक पं. रामदास पळसुले यांची साथ लाभली.
तिसऱ्या दिवशी (२६ जानेवारी) स्त्री ताल तरंग हा कार्यक्रम झाला. पहिल्या स्त्री घटमवादक सुकन्या रामगोपाल यांच्यासह सौम्या रामचंद्रन (व्हायोलिन), लक्ष्मी पिल्लई (मृदंग), वाय. जी. श्रीलता (वीणा) आणि भाग्यलक्ष्मी (मोर्चिंग) यांनी ही मैफल रंगवली.
पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने महोत्सवाची सांगता झाली. त्यांना तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांनी तबल्याची, तर कृष्णा मुखेडकर यांनी संवादिनीची साथ केली.