Ad will apear here
Next
गोविंदराव टेंबे, डॉ. आशुतोष जावडेकर
जुन्या पिढीचे सुप्रसिद्ध नाटककार आणि संगीतकार गोविंदराव टेंबे आणि नव्या पिढीचे संगीतकार, गायक डॉ. आशुतोष जावडेकर यांचा पाच जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय..
....
गोविंद सदाशिव टेंबे 
पाच जून १८८१ रोजी जन्मलेले गोविंदराव टेंबे हे नाटककार आणि संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. ते उत्कृष्ट संवादिनीवादक होते आणि पंडित भास्करबुवा बखले यांच्या साथीला ते असत. 

१९१३ साली सुरू झालेल्या ‘गंधर्व नाटक मंडळी’चे ते महत्त्वाचे आधारस्तंभ होते. ऑपेरा प्रकार मराठीमध्ये आणण्याचं श्रेय त्यांनाच जातं. ‘प्रभात’सारख्या मातब्बर चित्रपटनिर्मिती संस्थेत त्यांनी मोठं योगदान दिलं होतं. माझा संगीत व्यासंग, माझा जीवनविहार, कल्पनासंगीत, महाश्वेता, जयदेव, वरवंचना, तुलसीदास, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

नऊ ऑगस्ट १९५५ रोजी त्यांचं निधन झालं. 
........

डॉ. आशुतोष जावडेकर 

पाच जून १९७९ रोजी जन्मलेले डॉ. आशुतोष प्रकाश जावडेकर हे व्यवसायानं डेंटिस्ट असून, कवी, गायक, संगीतकार आणि लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘प्रथमतः मी लेखक आहे, गाणे आणि संगीत ही माझी आवड आहे आणि मी प्रोफेशनने डेंटिस्ट आहे,’ असं ते म्हणतात. नव्या पिढीच्या गायकीचा आणि संगीताचा त्यांचा विशेष अभ्यास आहे आणि या संदर्भात त्यांनी बरंच लेखन केलं आहे. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे आणि इस्लामपूर शाखेतर्फे मार्च २०१८मध्ये इस्लामपुरात आयोजित करण्यात आलेल्या  युवा साहित्य-नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद डॉ. जावडेकर यांनी भूषविलं आहे. मराठी भाषेबद्दलचे त्यांचे विचार https://youtu.be/BiHA8oHK95c या व्हिडिओत त्यांनी व्यक्त केले आहेत.

लयपश्चिमा, मुळारंभ, नवे सूर अन् नवे तराणे, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियाचाही ते लेखनासाठी प्रभावी वापर करतात. भाषण किंवा वृत्तपत्रात एखाद्या विषयावर लेख लिहिण्यापूर्वी सोशल मीडियावरून तरुणाईची मतं मागवून, त्यावर अभ्यास करून स्वतःची निरीक्षणं नोंदवणं आणि मतं मांडणं, अशा पद्धतीचा अवलंब ते करतात. त्यामुळे आपसूकच त्यांच्या लेखनात जनमानसाचं प्रतिबिंब पडतं. त्यामुळेच ते आजच्या पिढीचे लोकप्रिय लेखक आहेत.

अलीकडेच लॉकडाउनच्या काळात डॉ. जावडेकर यांनी कवयित्री इंदिरा संत यांची ‘संध्येतील वर्षेपरी’ ही कविता संगीतबद्ध केली आहे. प्रसिद्ध गायिका धनश्री गणात्रा यांनी ती गायली आहे. तसेच, लॉकडाउनच्या काळात इंग्रजी वाचनासंदर्भातील ऑनलाइन कार्यशाळाही डॉ. जावडेकर यांनी घेतल्या. 

(डॉ. आशुतोष जावडेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

(डॉ. आशुतोष जावडेकर यांनी लिहिलेले ‘लयपश्चिमा’ हे संगीतविषयक पुस्तक आणि त्यावरील कार्यक्रमाचे रसग्रहण वाचण्यासाठी येथे क्लिक करा. )

(कवयित्री इंदिरा संत यांची ‘संध्येतील वर्षेपरी’ ही कविता डॉ. आशुतोष यांनी संगीतबद्ध केली आहे. ती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.) 


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZDICN
Similar Posts
मंगेश राजाध्यक्ष, सुमती पायगावकर ज्येष्ठ समीक्षक आणि खुसखुशीत लेखांसाठी प्रसिद्ध असणारे मं. वि. राजाध्यक्ष आणि बालसाहित्यकार सुमती पायगावकर यांचा सात जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
अनंत काणेकर, डॉ. अनंत वर्टी ‘तू माझी अन् तुझा मीच ही खातर ना जोवरी, प्रीतीची हूल फुकट ना तरी!’ म्हणणारे लोकप्रिय कवी आणि लेखक अनंत काणेकर आणि प्रामुख्याने विनोदी लेखन करणारे डॉ. अ. वा. वर्टी यांचा दोन डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी....
विठ्ठल वाघ, उत्तम बंडू तुपे, नामदेव कांबळे ‘माझ्या मराठी मातीचा मला जिवापाड छंद,’ असं लिहिणारे कवी विठ्ठल वाघ, आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखं, अठराविश्वे दारिद्र्य यांचं विदारक वर्णन करणारे उत्तम तुपे, ‘राघववेळ’ सारखी जबरदस्त कादंबरी लिहिणारे नामदेव कांबळे, विनोदी कथाकार राजाराम राजवाडे, ‘ए पॅसेज टू इंडिया’सारख्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा लेखक इ
विल्यम ट्रेव्हर परिणामकारक लघुकथालेखनासाठी नावाजल्या गेलेल्या विल्यम ट्रेव्हरचा २४ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय....

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language