Ad will apear here
Next
भारतीय ज्ञानाचा खजिना
मुस्लीम आक्रमणापूर्वी भारताचे जगावरील प्रभाव, ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीबाबत भारत देश कसा श्रेष्ठ होता, यावर प्रशांत पोळ यांनी ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ यावर लिखाण केले आहे. 

पेशावर/रावळपिंडीपासून ते जावा-सुमात्रापर्यंतच्या (इंडोनेशिया) भूभागावर बाराशे वर्षे संस्कृत भाषा बोलली जात असे. तक्षशिला विद्यापीठाचा जगभरात दबदबा होता. जहाजबांधणीपासून वैद्यकशास्त्रापर्यंत आणि खगोलशास्त्रापासून धातूशास्त्रापर्यंत असे सुमारे २५ विषय तिथे शिकवले जायचे, अशी माहिती यात दिली आहे. त्याचप्रमाणे मगध राज्यातील (आताचे बिहार) नालंदा विद्यापीठाबद्दल सांगितले आहे. 

शिक्षण आणि व्यापार या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताचा जगात पहिला क्रमांक होता. निर्यातीचा वाटा २९ टक्के होता. आजतागायत हा विक्रम अबाधित आहे, असा दावा करीत युरोपियन इतिहासतज्ज्ञांनी तशा नोंदी इतिहासात करून ठेवल्या असल्याचे लेखकाचे म्हणणे आहे. कर्नाटकातील हंपी शहर, ऋग्वेद ग्रंथ, एक ते ६४ अशा अंकात लिहिलेला सिरीभूवलय ग्रंथ, ‘कटपयादी’ संख्या संकल्पना, याशिवाय आणखीही बरीच वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुस्तकात आहे.

पुस्तक : भारतीय ज्ञानाचा खजिना
लेखक : प्रशांत पोळ 
प्रकाशक : स्नेहल प्रकाशन
पाने : १६७
किंमत : २०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZOFBZ
 The author does not seem to be aware of the achIevements of the
Chinese civilisation . By all accounts , it is much older than India's er
Patriotism has no place in objective study of Histo
 Patriotism has no place in objective study of history .
The author seems to be unaware of the achievements of the
Chinese . They are much older than India's.
 Nobody disputes the importance and achievements of that civilisation.
To say that it was the earliest is stretching it a bit far . That is what the
argument is about .
 Did the well-known library in Tanjavor suffer at the hands of Hyder
Ali and Tippu Sultan ? Keral never suffered at the hands of Muslims .
Is their mathematics in the Malayalam script? How about the Jain
scriptures ? They exist - even today
Similar Posts
ते पंधरा दिवस ऑगस्ट १९४७ हा काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. एक ते १५ ऑगस्ट या स्थित्यंतराच्या काळातील आणि भारताचे भवितव्य ठरविणाऱ्या १५ दिवसांची गाथा प्रशांत पोळ यांनी ‘ते पंधरा दिवस’मधून कथन केली आहे.
‘भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ’ पुणे : ‘भारतीय विज्ञानात शाश्वत विकासाचे मूळ आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (१४ मे) पुण्यात केले. ‘ भारतीय ज्ञानाचा खजिना ’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, मूर्तिशास्त्राचे अभ्यासक डॉ
मराठे व इंग्रज पेशव्यांचे राज्य बुडाले, त्याला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ‘मराठेशाहीचे शतसावंत्सरिक श्राद्ध’ असे पुस्तक लिहिले, तेच हे पुस्तक. पूर्वरंग आणि उत्तरांग असे पुस्तकांचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात इंग्रजांपूर्वीचा महाराष्ट्र, इंग्रज हिंदुस्थानात का व कसे आले, या प्रश्नांचा
उद्योजक शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पराक्रम, शौर्य यांच्या कथा आपल्याला माहित असतात; पण त्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगितली जातात. त्यातील एक म्हणजे ते उद्योजक होते, असे प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले असून, त्यांच्या या गुणावर प्रकाश टाकला आहे. स्वतःचा उद्योग व्यवसाय करणे हाच खरा श्रीमंतीचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language