Ad will apear here
Next
सागर रेड्डी... नाम तो सुना होगा!
शाहरुख खानचा ‘...नाम तो सुना होगा’ हा संवाद अत्यंत लोकप्रिय झाला होता. शाहरुखप्रमाणेच आयुष्यात यश मिळवायचे असा निश्चय सागर रेड्डी करतो; पण ही वाट खडतर होती. याचे कारण सागरला घर नव्हते. तो अनाथ होता. लोणावळ्यातील बालग्राममध्ये त्याचे बालपण गेले. दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी तो मुंबईत दाखल होतो. तेथे खऱ्या अर्थाने जीवनाची परीक्षा सुरू होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे परवडत नसल्याने दाता शोधावा लागतो. मिळेल ते काम करून सागर शिक्षण पूर्ण करतो. बड्या कंपनीत नोकरी मिळाल्यावर त्याला कोऋहम् हा प्रश्न पडला. तेव्हा त्याला डोळ्यांसमोर त्याच्या अनाथ बांधवांचे चेहरे दिसायला लागतात आणि जीवनाचे इप्सित गवसते. स्वतः अनाथ असूनही त्याने अनेकांचे पालकत्व प्रेमाने स्वीकारले. त्यासाठी अनेक सुवर्णसंधींवर त्याने पाणी सोडले. अलौकिक उंचीवर गेलेल्या सागरची ही खरीखुरी, प्रेरणादायी कहाणी सुनीता तांबे यांनी ‘सागर रेड्डी... नाम तो सुना होगा’ या पुस्तकातून कथन केली आहे.

पुस्तक : ‘सागर रेड्डी... नाम तो सुना होगा
लेखक : सुनीता तांबे
प्रकाशक : अक्षयभारती प्रकाशन
पृष्ठे : १५२
मूल्य : २०० रुपये

(‘सागर रेड्डी... नाम तो सुना होगा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZRRCD
Similar Posts
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील उपनिषद आहे. अनेक जण ते नेहमी म्हणतात, त्याची आवर्तनेही करतात; मात्र त्यातील अनेक शब्दांचा अर्थ लक्षात येतोच असे नाही. म्हणूनच स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांनी ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’ या पुस्तकात गणपती अथर्वशीर्षाचे सूक्ष्म-अर्थविवरण केले आहे. कथा, नाममंत्र
साहित्याच्या पारावर : ३०वी मैफल (व्हिडिओ) ‘ग्रंथाली’च्या ‘साहित्याच्या पारावर’ या ग्लोबल साप्ताहिक साहित्यमैफलीच्या ३०व्या भागात डॉ. सिसिलिया कार्व्हालो आणि राजीव जोशी हे साहित्यिक सहभागी झाले होते. मेधा आलकरी यांनी संवादकाची भूमिका निभावली. वाचक प्रतिनिधी म्हणून रंजना पाटील आणि राजन पाटकर हे सहभागी झाले होते...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language