Ad will apear here
Next
महाराष्ट्राच्या पंचकन्या
एकोणिसाव्या शतकातील कर्तृत्ववान महिलांची ओळख अशोक बेंडखळे यांनी ‘महाराष्ट्राच्या पंचकन्या’मधून करून दिली होती. न्यायमूर्ती रानडे यांच्या द्वितीय पत्नी रमाबाई रानडे यांनी न्या. रानडे यांच्या हाताखाली शिक्षणाचे व समाजसेवेचे धडे घेतले. पतीच्या पश्चात सेवासदन संस्थेची स्थापना करून गरीब संसारी स्त्रियांना रोजगार व शिक्षण दिले. त्यांची कहाणी यातील पुस्तकात सांगितली आहे.

महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा काढणारे ज्योतिराव फुले यांना समर्थ साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी चरित्रही वाचायला मिळते. रूढी, परंपरेत अडकलेल्या स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांचा प्रगतीचा मार्ग ‘शारदा सदन’ या संस्थेद्वारे खुला करणाऱ्या पंडिता रमाबाई, कवी रेव्ह. ना. वा., टिळक यांच्या पत्नी लक्ष्मीबाई टिळक यांचे समाजकार्य, ख्रिस्त धर्म स्वीकारण्याचे धाडस आणि साहित्यिक म्हणून त्यांची ओळख या मालिकेतील एका पुस्तकातून होते. अनाथ मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्यभर झटलेले महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी भक्कम साथ दिली. त्यांचे कार्यकर्तृत्व सांगणारे एक पुस्तक या मालिकेत आहे.  
     
पुस्तक : महाराष्ट्राच्या पंचकन्या 
लेखक : अशोक बेंडखळे
प्रकाशक : राजा प्रकाशन
पाने : २४७
किंमत : ३०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZWHCA
Similar Posts
बेकरी बेकरी बेकरी उत्पादने हल्ली अनेकदा खाण्यात येतात. बिस्किटे, पाव, खारी, टोस्ट, बटर या शिवाय बेकरी उत्पादनातील सर्वांत खपाचा व लोकप्रिय प्रकार म्हणजे केक. हे सर्व पदार्थ जेथे तयार होतात, त्याला ‘बेकरी’ म्हणतात. बेकरी व्यवसायासाठी काय आवश्यक असते, याची सखोल माहिती शेफ विष्णू मनोहर यांनी ‘बेकरी बेकरी’मधून दिली आहे
विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य शेफ विष्णू मनोहर हे आता मराठी कुटुंबात सर्वांनीच परिचित आहेत. विविध पाककृतींवरील त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत. यातील पाच पुस्तकांचा संच ‘विष्णू मनोहर यांचे चविष्ट ‘पंच’ खाद्य’मधून वाचकांच्या भेटीस आला आहे.
वन मॅन शो - दिलीपकुमार यांचा ‘गंगा-जमुना’ कोणत्याही सिनेमाची कथा ऐकण्याची उत्सुकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच असते. अशा कथा सांगणारी बरीच मंडळी असतात; मात्र चित्रपटांच्या पडद्यामागच्या कथा सांगणारी माणसं विरळाच. ‘‘शिणेमाच्या ष्टोरी’मागील गोष्ट’ या अभिजित देसाई यांच्या पुस्तकात अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या पडद्यावरच्या आणि पडद्यामागच्या चटकदार आणि मजेशीर कथा वाचायला मिळतात
हुतात्मा गोविंदराव डावरे काळाच्या पडद्याआड गेलेले हुतात्मा क्रांतिवीर गोविंदराव डावरे यांचे कार्य विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशात आणले आहे. हुतात्मा डावरे यांचे चरित्र सांगताना पुस्तकात प्रारंभी १७२५ ते १८६५ पर्यंतच्या घटनांचे वर्णन केले आहे. त्यानंतरचा भाग गोविंदरावांच्या जन्मापासून सुरू होतो

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language