
आयुर्वेदाबद्दल सध्या जागरूकता आहे. आयुर्वेदिक उपचारांना प्राधान्य दिले जात आहे. आयुर्वेदाचे अध्ययन करताना संस्कृत व मराठी भाषेतील जड शब्दांचे आकलन लवकर होत नाही. म्हणूनच सोप्या मराठी भाषेत याचे ज्ञान सर्वांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी आणि प्रा. डॉ. अभिनंदन मुके यांनी ‘चित्ररूप आयुर्वेदीय संप्राप्ती सूत्रे’मधून केला आहे.
आयुर्वेदात अचूक चिकित्सेसाठी रोगसंप्राप्तीच्या ज्ञानाला महत्त्व आहे. ही रोगसंप्राप्ती लक्षात ठेवण्यासाठीचे सोपे मार्ग यात सांगितले आहेत. आयुर्वेदातील सूत्रे व त्याचा मराठीतीमध्ये अर्थ दिला आहे. संप्राप्ती म्हणजे काय, त्याची गरज व उपयोग हे स्पष्ट केले आहे कोणत्याही व्याधीची संप्राप्ती समजण्यासाठी त्या रोगाला कारणीभूत दोष, दुष्य, दोषांचा संचार, व्याधीचे उद्भवस्थान, हेतू, अधिष्ठान, व्यक्तस्थान यांचा अभ्यास कसा करावा, हे यातून सूत्रे, भाषांतर व चित्ररूपाने सांगितले आहे. काही व्याधींची लक्षणेही यात दिली आहेत.
पुस्तक : चित्ररूप आयुर्वेदीय संप्राप्ती सूत्रे
लेखक : प्रा. डॉ. पां. ह. कुलकर्णी, प्रा. डॉ. अभिनंदन मुके
प्रकाशक : दीर्घायू इंटरनॅशनल
पाने : ७६
किंमत : २०० रुपये
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)