Ad will apear here
Next
र. धों. कर्वे यांच्यावरील ‘समाजस्वास्थ’ नाटक ‘यू-ट्यूब’वर
पुणे : तब्बल शतकभरापूर्वी देशात ज्या विषयाची चर्चादेखील वर्ज्य होती, अशा संततिनियमनासारख्या विषयावर जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य करणारे समाजसुधारक रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे यांच्यावरील ‘समाजस्वास्थ्य’ हे गाजलेले नाटक जुलै २०१८मध्ये ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध करून देण्यात आले. त्या नाटकाला आतापर्यंत ११ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लैंगिक शिक्षण, लैंगिक स्वातंत्र्य, स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यासाठी र. धों. कर्वे यांनी त्यांचे आयुष्य वेचले. या विषयांवर जनजागृती करण्यासाठी १५ जुलै १९२७ रोजी त्यांनी ‘समाजस्वास्थ’ नावाचे मासिक सुरू केले. या मासिकाला १५ जुलै २०१८ रोजी ९० वर्षे पूर्ण झाली. या घटनेचे औचित्य साधून ‘रधों’च्या कार्याचा वेध घेणारे आणि ‘नाटकघर’ संस्थेची निर्मिती असणारे ‘समाजस्वास्थ्य’ हे नाटक ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना उपलब्ध करून देण्यात आले. त्याआधी सव्वा वर्षापूर्वी नाटककार अजित दळवी यांनी हे नाटक लिहिले आणि  रंगकर्मी अतुल पेठे यांनी दिग्दर्शनासोबतच ‘रधों’च्या भूमिकेची जबाबदारी पेलत विविध ठिकाणी, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांत त्याचे ७६ प्रयोग केले. त्यानंतर ते नाटक ‘यू-ट्यूब’च्या माध्यामातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आले असून, ते या लिंकवर उपलब्ध आहे.

याबाबत अतुल पेठे म्हणाले, ‘व्यक्ती व समाजाच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासंबंधीच्या उपायांची चर्चा करण्याच्या हेतूने ९० वर्षांपूर्वी १५ जुलै १९२७ ला प्राध्यापक रघुनाथ धोंडो कर्वे यांनी ‘समाजस्वास्थ्य’ या बंडखोर पुरोगामी मासिकाची सुरुवात केली. स्वत:च्या पदराला खार लावून सलग २६ वर्षे चार महिने त्यांनी हे मासिक सातत्याने पराकोटीच्या निष्ठेने काढले. त्यातील अनेक लेख वादळी आणि वादग्रस्त ठरले. मासिकावर खटलेही भरले गेले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य आणि लैंगिक स्वातंत्र्य या संदर्भातले हे महत्त्वाचे लढे होते. मासिकावरील दुसरा खटला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रा. कर्वे यांच्या बाजूने लढले होते. या तेजस्वी लढ्यांवर बेतलेल्या ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकाचे १६ महिन्यांत विविध गावांत आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवांत एकूण ७६ प्रयोग झाले. आता जगभर पसरलेले प्रेक्षक आणि अभ्यासकांसाठी ते आम्ही ‘यू-ट्यूब’च्या माध्यमातून खुले केले.’

हे नाटक ‘यू-ट्यूब’वर अपलोड झाल्यापासून आतापर्यंत ११ हजार पाचशेहून अधिक जणांनी पाहिले आहे. हे नाटक इंग्रजी सबटायटल्ससह उपलब्ध आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQGBQ
Similar Posts
‘माणसे हाच सकारात्मक ऊर्जेचा स्रोत’ आनंदी आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक विचारांची ऊर्जा खूप गरजेची असते. म्हणूनच ‘बी पॉझिटिव्ह’ हे ब्रीदवाक्य घेऊन BytesofIndia.com हे पोर्टल सुरू करण्यात आले. जी माणसे यशस्वी झालेली असतात, ज्यांनी मोठे, वेगळे आणि चांगले काम करून दाखवलेले असते, त्यांच्यामध्ये सकारात्मकता हा समान धागा असतो. या
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
‘राजसन्मान’ एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी २३-२४ नोव्हेंबरला पुणे : ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राजसन्मान राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका’ स्पर्धेची प्राथमिक फेरी शनिवार, दि. २३ व रविवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी लोकायत सभागृह येथे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language