Ad will apear here
Next
केशायुर्वेद
केस हा आपल्या शरीराचा अविभाज्य; पण दुर्लक्षित भाग समजला असे. हल्ली सौंदर्यशास्त्र चिकित्सेनुसार केसांचे सौंदर्य राखण्यासाठी लक्ष दिले जाते. वैद्य हरीश पाटणकर यांनी यावर आयुर्वेदाच्या दृष्टीने केसांवर सुंदर व सुरक्षित चिकित्सापद्धती तयार केली असून, त्याची माहिती ‘केशायुर्वेद’मधून दिली आहे. 

उत्पत्ती स्थिती व लय हा सृष्टीचा नियम केसांना कशा पद्धतीने लागू पडतो, हे सांगत केश त्रिदोष विचार समजून दिले आहे. केश व सप्तधातू संबंध, केश व त्रिमल विचार, केश व पंचमहाभूत विचार, केश षडरस संबंध, आहाराचा कमी-अधिक, चांगला-वाईट परिणाम आदी माहिती दिली आहे. कोंडा होणे, चाई पडणे, केस गळणे, केस पिकणे, केश दुभंगणे, खडवे पडणे, उवा होणे आदी केसांसंदर्भातील समस्यांची कारणे व त्यावरील आयुर्वेदीय उपाय सांगितले आहेत. अनावश्यक केस, आधुनिक सौंदर्य उपचारांचा केसांवरील परिणाम, केशवृद्धी उपचार, केसांचे पथ्यापथ्य आदींवरही मार्गदर्शन केले आहे.    
     
पुस्तक : केशायुर्वेद
लेखक : वैद्य हरिश पाटणकर
प्रकाशक : पद्मज प्रकाशन
पाने : ९६
किंमत : १६० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZUUCA
Similar Posts
‘केशायुर्वेद’तर्फे २७ जानेवारीला आंतरराष्ट्रीय परिसंवाद पुणे : वैद्य हरीश पाटणकर यांच्या संकल्पनेतून आणि बीव्हीजी इंडियाच्या सहकार्याने साकारलेल्या ‘केशार्युवेद’ या भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब आणि संशोधन केंद्रातर्फे ‘इनोव्हेटिव्ह आयुर्वेद’ यावर आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता सेनापती
‘आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे’ पुणे : ‘शास्त्रोक्त उपचारपद्धती असलेल्या आयुर्वेदात मोठी क्षमता आहे. मूळव्याध, कर्करोग, वातीचे आजार अशा दुखण्यांवर चार-पाच पिढ्या घरगुती उपचार करणाऱ्या जवळपास तीन लाख लोकांना भेटलो आहे. त्यातील अनेकांच्या उपचाराच्या पद्धती आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. आपल्याकडे आयुर्वेदात नाविन्यपूर्ण संशोधन झाले, आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती होईल
‘आयुर्वेद जागतिक पातळीवर विकसित व्हावा’ पुणे : ‘आयुर्वेद क्षेत्रात बरेच वर्षे काम करत असून, आयुर्वेदाला जागतिक व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत आयुर्वेद पोहचविणे आवश्यक आहे. जागतिक पातळीवर आयुर्वेदाला विकसित करण्यासाठी भारतीय आयुर्वेदाचार्यांचा पुढाकार महत्त्वपूर्ण आहे,’ असे मत नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदाचे संचालक डॉ
केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा पुणे : ‘भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब अँड रिसर्च सेंटर असलेल्या केशायुर्वेदच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्यवर्धिनी चिकित्सालय व बीव्हीजी इंडिया यांच्या वतीने १०८ सेवाशाखा संकल्पपूर्ती सत्कार व केशायुर्वेद पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. शुक्रवार, १९ जुलै २०१९ रोजी दुपारी तीन

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language