Ad will apear here
Next
गुरुवर्य पुरस्कार हा यशस्वी पालकत्वाचा सन्मान : सोळंकी
गोयल गंगा फाउंडेशनतर्फे गुरुवर्य पुरस्कार वितरण
ललिता रैना यांना पुरस्कार प्रदान करताना भारती भागवाणी, सोनू गुप्ता, जयप्रकाश गोयल, विशाल सोळंकी, अतुल गोयल, अरुण गुप्ता 

पिंपरी : ‘विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या मुलामुलींचे आपल्याला केवळ यश दिसते; पण त्यांच्या अपयशात त्यांना खंबीरपणे साथ व प्रोत्साहन देणारे, त्यांच्यासाठी अहोरात्र कष्ट घेणारे त्यांचे पालक असतात. म्हणूनच त्यांचा त्या यशात मोलाचा वाटा असतो. गुरुवर्य पुरस्काराने अशा पालकांचा होणारा गौरव म्हणजे यशस्वी पालकत्वाचा सन्मान आहे,’असे मत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केले. 

पालकांच्या कष्टाला कौतुकाची थाप देण्यासाठी नुकतेच गोयल गंगा फाउंडेशनतर्फे या पुरस्काराचे आयोजन केले होते. या वेळी गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, गीता गोयल, अतुल गोयल, सोनू गुप्ता गोयल, अरुण गुप्ता, इतिहासकार शिवप्रसाद मंत्री, इस्कॉनचे माजी उपाध्यक्ष बाल गोविंद दास, गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी प्रसिद्ध टेनिसपटू अंकिता रैनाच्या आई ललिता रैना आणि बेघर मुलांचे पुनर्वसन करणाऱ्या राधिका दळवी यांना जयप्रकाश गोयल आणि विशाल सोळंकी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. भारतीय महिला रग्बी संघाच्या कर्णधार वाहबिझ भरुचा यांचे प्रशिक्षक संजय कांबळे यांच्या वतीने वाहबिझ भरुचा हिने अतुल गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. ऑलिंपिकमध्ये जलतरणात शानदार कामगिरी करणाऱ्या कॅमिला पटनायक हिच्या पालकांना बाल गोविंद दास यांच्या हस्ते, तर अनुभवावर आधारित शिक्षण मिळण्यासाठी आपल्या मुलींना होम स्कूलिंगच्या माध्यमातून शिकवणारे मंदार व सविता कापशीकर यांना शिवप्रसाद मंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

वाहबिझ भरुचा यांना पुरस्कार प्रदान करताना भारती भागवाणी, सोनू गुप्ता, जयप्रकाश गोयल, विशाल सोळंकी, अतुल गोयल, अरुण गुप्ता

या वेळी अतुल गोयल म्हणाले, ‘पालकच मुलांचे पहिले गुरु असतात. म्हणूनच प्रत्येक यशस्वी व्यक्तिमत्वामागे कणखरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या पालकांचे व गुरूंचे सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला आहे.’ 

या वेळी आयआयटीचे प्राध्यापक मनीष जैन यांनी प्रात्यक्षिकांच्या आधारे पालकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘केवळ पुस्तकी ज्ञान देणे आवश्यक नसून, प्रत्येक उत्तरामागचे तर्कशास्त्र समजून घेण्यावर भर दिला जावा. प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून घेतलेल्या शिक्षणामुळे विषयाचे आकलन सहजसुलभ होते. यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता व विषयातील रुची वाढण्यास मदत होते.’

मानसशास्त्रज्ञ श्रीधर माहेश्वरी यांनीही पालक आणि मुलांचे नाते याविषयावर मार्गदर्शन केले. प्रीती बाणे यांनी पालकांना मुलांशी संवाद साधताना कोणकोणत्या प्रभावी संभाषण कौशल्याचा उपयोग केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.

या वेळी गोयल गंगा इंटरनॅशन स्कूलसाठी काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण संस्कृती नृत्याच्या माध्यमातून एकीचा संदेश दिला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZMXCH
Similar Posts
टाटा मोटर्सतर्फे ५०० गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुणे : आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी टाटा मोटर्सतर्फे यंदा पुण्यातील इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या ५०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी चार हजार रूपयांची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळणार आहे.
गोळाफेक स्पर्धेत ‘सूर्यदत्ता’च्या सावरी शिंदेला रौप्यपदक पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या १९ वर्षांखालील मुलींसाठीच्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत सूर्यदत्ता पब्लिक स्कूलच्या सावरी शिंदे हिने रौप्यपदक जिंकले. आता ती राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. १३.१२ मीटरचा पल्ला गाठून तिने हे यश संपादन केले
पुण्यातील शाळांमध्ये वाजणार वॉटर बेल पुणे : मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी आता शाळांमध्ये वॉटर बेल वाजणार आहे. शाळेत खेळण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात मुले पाणी प्यायचे विसरतात, त्यामुळे आवश्यकतेपेक्षा कमी पाणी शरीरात जाते. यामुळे अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. ते टाळण्यासाठी आता शाळांमध्ये ठराविक काळानंतर मुलांना पाणी
‘संगीत आणि नृत्याविष्कारामुळे जीवन सुसह्य होते’ पुणे : ‘पृथ्वीवर केवळ मानवप्राणी हा एकमेव आहे, ज्याला ईश्वराकडून कलेची देणगी मिळालेली आहे. संगीत आणि नृत्याविष्कारामुळे आपले जीवन सुसह्य झाले आहे,’ असे मत ज्येष्ठ नृत्यगुरू आणि भरतनाट्यम नृत्य कलाकार सुचेता भिडे-चापेकर यांनी व्यक्त केले. लायन्स क्लबतर्फे आयोजित कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठीच्या समूहनृत्य

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language