Ad will apear here
Next
यशस्वी भव
जीवनात यशापयश, चढ-उतार हे चक्र सुरूच असते. अपयश आले म्हणून खचून जाता यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत, वेळेचा सदुपयोग, ठाम विश्वास याची गरज असते. यासाठी बालपणापासूनचे संस्कारही महत्त्वाचे ठरतात. यशासाठी काय हवे याबद्दल ‘यशस्वी भव’ या पुस्तकात धनराज खरटमल यांनी छोटे छोटे मुद्दे सांगितले आहेत. अनेक उदाहरणांद्वारे त्यांनी यशाची वाट दाखवली आहे. जन्माला येत असतानाच आपल्यात लढाऊ वृत्ती कशी असते, हे प्रथम सांगून याच बाण्याचा वापर पुढे कसा होतो, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. महत्त्वाकांक्षा ठेवून कामालालागणे, बुद्धीचा वापर चौकसपणे करणे, गुणवत्ता ही कोणाची मक्तेदारी असून, प्रचंड चिकाटी ही यशाची पहिली पायरी असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. प्रोत्साहित करणारे वातावरण, सतत नव्या संधी शोधणे, कष्टाची व प्रयत्नांची कास न सोडणे, संघर्ष व मेहनतीला पर्याय नाही, मिळेल त्या संधीचा लाभ घेणे, ‘डोक्यावर बर्फ व तोंडात साखर’ अशी वृत्ती ठेवणे असे अनेक मुद्दे खरटमल यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले आहेत.

पुस्तक : यशस्वी भव
लेखक : धनराज खरटमल
प्रकाशक : भाष्य प्रकाशन
पृष्ठे : १५२
मूल्य : २०० रुपये

(‘यशस्वी भव’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZUXCC
Similar Posts
सुहाना सफर भटकंती, पर्यटन हा दैनंदिन जीवनातील विरंगुळा ठरतो. म्हणून अनेक जन दर वर्षी नियमाने फिरायला जातात. धनराज खरटमल यांना कॉलेजजीवनापासूनच फिरण्याची आवड होती. पुढेही ती जपली. या भटकंतीचे वर्णन त्यांनी ‘सुहाना सफर’मधून केले आहे.
टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन आर्थिक बाजारात पैसे कमविण्यासाठी चांगली संधी असते; मात्र अनेक गुंतवणूकदारांना शेअर बाजाराचे अपुरे ज्ञान असल्याने पैसे गमविण्यासाठी वेळ त्यांच्यावर येते. स्वतःची मेहनतीची कमाई अशा प्रकारे घालविण्याऐवजी योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे गुंतविण्यासाठी रवी पटेल यांनी ‘टेक्निकल अॅनालिसिस आणि कॅन्डलस्टिकचे मार्गदर्शन’मधून
श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार गणपती अथर्वशीर्ष हे अथर्ववेदातील उपनिषद आहे. अनेक जण ते नेहमी म्हणतात, त्याची आवर्तनेही करतात; मात्र त्यातील अनेक शब्दांचा अर्थ लक्षात येतोच असे नाही. म्हणूनच स्वामी माधवानंद (डॉ. माधव नगरकर) यांनी ‘श्रीगणपती अथर्वशीर्ष भावार्थसार’ या पुस्तकात गणपती अथर्वशीर्षाचे सूक्ष्म-अर्थविवरण केले आहे. कथा, नाममंत्र

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language