Ad will apear here
Next
‘इन्स्टामोजो’तर्फे मतदानासाठी ‘आय अॅम एमएसएमई’ मोहीम
बेंगळूरू : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना (एमएसएमई) मतदानाचा हक्क बजावण्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम ‘इन्स्टामोजो’ या कंपनीने सुरू केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत लघु उद्योजकांनी जाणीवपूर्वक मतदानाचा हक्क बजावावा, तसेच त्या निमित्ताने आपल्या लघु उद्योग क्षेत्राच्या भविष्य उभारणीसाठी योगदान द्यावे, यासाठी या उद्योजकांना विशेष आवाहन करण्यात येणार आहे. ‘आय अॅम एमएसएमई’ ही मोहीम आठ एप्रिल २०१९ पासून सुरू झाली.

भारतात सध्या ६.३ कोटी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आहेत. या संख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. ‘आय अॅम एमएसएमई’ या मोहिमेद्वारे ‘इन्स्टामोजो’ देशभरातील लघु उद्योगांपर्यंत सोशल मीडिया व डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोचू शकणार आहे. यासाठी ‘इन्स्टामोजो’ने वेबलिंक सुरू केली आहे. या वेबसाइटमधून लघु उद्योजकांना मतदान करण्याची शपथ देण्यात येईल, तसेच त्यांना त्यांच्या व्यवसायातील व एकंदर क्षेत्रातील कोणत्याही तीन महत्त्वाच्या समस्या मांडण्याची संधी देण्यात येईल.

संपद स्वेनमोहीम सादर करताना ‘इन्स्टामोजो’चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी संपद स्वेन म्हणाले, ‘आम्ही ‘एमएसएमई’ व्यावसायिकांना डिजिटल पद्धतीने कामे करण्यास उद्युक्त करून त्यांना सशक्त बनवण्याच्या दिशेने सतत काम करीत आहोत. यातूनच ‘आय अॅम एमएसएमई’ या मोहिमेची कल्पना घेऊन आम्ही आलो आहोत. आगामी निवडणुकीत सक्रीय सहभागी होण्याबरोबरच या लघु उद्योजकांनी व लहान व्यावसायिकांनी पुढील पाच वर्षांत आपल्या काय अपेक्षा आहेत, हे सरकारला सांगावे, असा आमचा हेतू आहे. आगामी पाच वर्षे या ‘एमएसएमई’ क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण या काळात डिजिटल यंत्रणांमुळे सर्वच व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणार आहेत व अशावेळी लघु उद्योगांना सरकारने उभारी देण्याची गरज भासणार आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZVBBZ
Similar Posts
छोट्या व्यवसायांसाठी तत्काळ कर्जाची सुविधा पुणे : एखाद्या छोट्या व्यापाऱ्याला विक्रीचे पैसे येण्यासाठी दोन तीन दिवसांचा वेळ लागणार आहे आणि नेमकी त्यादरम्यान त्याला खेळत्या भांडवलाची गरज लागली, तर बँकेकडून कर्ज मिळेपर्यंत थांबणे शक्य नसते. अशावेळी मदतीला येते ती इन्स्टामोजोची मोजोकॅपिटल ही अनोखी सुविधा.
पुढील वर्षी देशभरात धावणार इलेक्ट्रिक रिक्षा बेंगळूरू : महिंद्रा इलेक्ट्रिकने संपूर्णपणे विजेवर चालणारी ‘ट्रिओ’ नावाची रिक्षा निर्माण केली आहे. देशात या वाहनांचा वापर करण्यास उत्तेजन देण्यासाठी महिंद्रा इलेक्ट्रिक व थ्री व्हील्स युनायटेड (टीडब्लूयू) यांनी सामंजस्य करार केला आहे. पुढील वर्षी देशभरात दोन हजारहून अधिक महिंद्रा ट्रिओ रस्त्यावर उतरविण्याचे उद्दिष्ट आहे
‘महाबँके’ची ‘माइंड सोल्यूशन्स’सोबत भागीदारी पुणे : ‘ए. टीआरईडीएस’ प्लॅटफॉर्मवर सहभागी होण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने माइंड सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यासोबत भागीदारी केली आहे. ‘ए. टीआरईडीएस’ हे लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) त्यांच्या लिलाव प्राप्त झालेल्या तंत्रज्ञानाद्वारे प्रतिस्पर्धात्मक दराने वित्तपुरवठा करण्यासाठी एक डिजिटल
कॅपिटावर्ल्डतर्फे स्मार्ट लोन डिसइंटरमिडेशन इकोसिस्टम मुंबई : ‘कॅपिटावर्ल्ड’ या आघाडीच्या डिजिटल मंचातर्फे, संपूर्ण लोन व्हॅल्यू चेन असलेल्या, क्रांतिकारी अशा ‘स्मार्ट लोन डिसइन्टरमिडेशन इकोसिस्टम’च्या पहिल्या व्हर्जनची यशस्वी सुरूवात केल्याची घोषणा करण्यात आली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language