Ad will apear here
Aniket Konkar
संपादक, Bytesofindia.com
कॉलेजजीवनापासून लेखनाची सुरुवात. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून बीएस्सी अॅग्रिकल्चर ही पदवी. पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवी. ‘सकाळ’ समूहाच्या अॅग्रोवन या कृषीविषयक दैनिकात उपसंपादक म्हणून २००८ साली पुण्यातून पत्रकारितेची सुरुवात. अॅग्रोवनमध्ये सुमारे तीन वर्षे काम केल्यावर २०१०मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या नव्याने सुरू होणाऱ्या पुणे आवृत्तीच्या पहिल्या टीममध्ये निवड. महाराष्ट्र टाइम्समध्ये सहा वर्षांहून अधिक काळ उपसंपादक म्हणून कार्यरत. विज्ञान-तंत्रज्ञान, सामाजिक घडामोडी, कृषी, पर्यावरण, पर्यटन, भाषा, साहित्य, खाद्यपदार्थ यांसह विविध विषयांवर विविध स्वरूपातील लेखन. ‘मनस्पंदने’ या ब्लॉगद्वारे ललित लेखन. याच कालावधीत पुणे आकाशवाणीच्या वृत्तविभागात हंगामी वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार म्हणून पाच वर्षे काम. ‘दूरदर्शन’साठी काही कृषिविषयक कार्यक्रमांचे लेखन. २०१८ साली रत्नागिरीत, मूळ गावी स्थलांतर.

Bytesofindia.com या पॉझिटिव्ह मीडिया पोर्टलचा संपादक म्हणून फेब्रुवारी २०१७पासून कार्यरत.
.....
- ‘झोंपाळ्यावरची गीता’ या १०० वर्षे जुन्या, दुर्मीळ पुस्तकाचे संकलन करून पुनर्प्रकाशन
- रत्नागिरी आकाशवाणीसाठी पर्जन्यजलसंचय या विषयावर लेखन
- राज्य सरकारतर्फे दिला जाणारा २०१८चा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार (सोशल मीडिया) मिळाला आहे.
View Aniket's Posts
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language